रत्नागिरी : रत्नागिरीतील राजिवडा येथे घरात घुसून धुडघूस घालणाऱ्या सात पैकी पाच संशयितांना अटक करण्यात आली. न्यायालयाने या सर्वांना ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
राजिवड्यातील फिर्यादी महिलेच्या घरात घुसून सातजणांनी घरातील वस्तू इकडेतिकडे फेकल्या. पती कुठे आहेत, त्यांना ठार मारतो, असे सांगून मुलाला शाळेतून आणण्यास गेलेल्या पती अब्दुल्ला वस्ता यांना अडवून बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. दि. २७ नोव्हेंबर रोजी हा गुन्हा घडला होता. गुन्ह्यातील सात पैकी पाच संशयित अमीर मुजावर, मुजफ्फर मुजावर, फैजान फणसोपकर, जमीर मुजावर, सलमान पकाली (सर्व रा. राजीवडा) यांना अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. संशयितांनी मारहाण केलेले अब्दुल्ला वस्ता गंभीर जखमी असून, त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यात वापरलेल्या लोखंडी सळ्या जप्त करायच्या आहेत. शाहरुख पकाली व अरमान मुजावर हे दोघे फरार असून, त्यांच्या अटकेसाठी संशयितांना पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सहाय्यक सरकारी वकील निलांजन नाचणकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 06/Dec/2024














