मुंबई : Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana Promise : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. महायुतील २०२४च्या विधानसभा निवडणुकीत २०० पार जागा मिळाल्या. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला.
त्यांना १३२ जागा मिळाल्या. तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठे यश मिळाले. महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असे अनेक राजकीय तज्ज्ञमंडळींचे म्हणणे आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना २१०० रुपये दिले जाणार, असे आश्वासन महायुतीने निवडणुकीआधी केले होते. त्या मुद्द्यावर नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्याचे फडणवीसांनी उत्तर दिले.
“लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. ही योजना पुढेदेखील सुरूच ठेवली जाईल. त्यात वाढ करून २१०० रुपये दरमहा दिले जातील. पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू. राज्यातील सर्व आर्थिक स्रोत यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्या प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय केले जातील. २१०० रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासने दिली आहेत, ती नक्कीच पूर्ण करू. त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे, ती आपण करू आणि जे लोक निकषाच्या आत बसतील, त्यांना योजनांचा लाभ नक्कीच होईल. कोणीही वंचित राहणार नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
“पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा शेतकऱ्यांसाठी योजना आणली, त्यावेळी सुरुवातीच्या काळात काही निकषाबाहेरच्या शेतकऱ्यांनाही त्या योजनेचा लाभ मिळाला होता. नंतर या शेतकऱ्यांनी स्वतःहूनच ते निकषाबाहेरील असून त्यांना योजनेची गरज नाही हे स्पष्ट केले आणि मग अंतिम छाननी करून ती योजना स्थिर करण्यात आली. तशाच पद्धतीने आता देखील महत्त्वाच्या गोष्टींची चाचपणी केली जाईल. निकषांमधील सर्व लोकांना योजनांचा लाभ मिळेल. लाडकी बहिणी योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याची महायुती सरकारची अजिबातच मानसिकता नाही. ही योजना सुरुच राहिल,” असा पुनरुच्चार फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला.
लाडकी बहीण योजना सुरुच राहणार- देवेंद्र फडणवीस
‘जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण करू . ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते ती आधी करू . निकषाच्या बाहेर कोणी भेटला , तक्रारी आल्या तर त्याचा पुनर्विचार ही करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले . शेतकरी सन्मान योजनेतही सुरुवातीला जे लाभार्थी होते . तेव्हाही लक्षात आलं होतं की मोठ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय . नंतर अनेक शेतकऱ्यांनीच सांगितलं आम्ही निकषात बसत नाही . त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेत जर काही महिला निकषाच्या बाहेर जात असतील तर त्याचा पुनर्विचार केला जाईल’, पण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचं कारण नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले .
निकषाबाहेर असणाऱ्या अर्जांचा पुर्नविचार करणार
लाडकी बहीण योजनेचे पैसे गरजवंतांना मिळावे यासाठी या योजनेत पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार असून गरजू महिलांनाच अर्थसहाय्य मिळावे यासाठी पडताळणी केली जाणार असल्याचं नुकतच सांगण्यात आलं होतं . राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात होता. निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला होता त्या त्या सर्व महिलांना दर महिन्याला रु1500 पयांचा हप्ता दिला गेला. त्याचबरोबर निवडणुकीनंतर सत्ता आल्यास 2100 रुपयांचा हप्ता देऊ, असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. हे पैसे गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात असल्याची वृत्त येत होती. आता मुख्यमंत्रीपदावर बसल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण सुरुच ठेवणार असल्याचं सांगत 2100 रुपये देणार असल्याचंही सांगितलंय. योजनेत ज्या महिला निकषाबाहेर जे असतील त्यांचा पुनर्विचार करणार असल्याचं सांगितलंय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 06-12-2024














