रत्नागिरी : चंपक मैदानाजवळील दुचाकी चोरीतील संशयिताला अटक; नंबरप्लेट बदलून करत होता वापर

रत्नागिरी : शहरालगतच्या चंपक मैदानाजवळच्या रस्त्यावर उभी करून ठेवलेली दुचाकी चोरून नेणाऱ्या संशयिताला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. असीम मुख्तार नाईक (वय २५, रा. नाईकनगर पोमेंडी बु.) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दुचाकीचा नंबर बदलून आरोपी ती वापरत होता. रत्नागिरी शहरातील बोर्डिंग रोड येथे राहणाऱ्या महंमद शाहीद वजीद अहमद पीरजादे या तरूणाने आपली एक्सेस दुचाकी चंपक मैदानाजवळच्या महामार्गावर मंगळवारी रात्री ९.३० वा. च्या सुमारास ही दुचाकी पार्किंग करून ठेवली होती. अर्ध्या तासाने तो तरुण दुचाकी नेण्यासाठी आला असता त्याठिकाणी गाडी दिसून आली नाही.

शोध घेऊन कुठेही दुचाकी मिळून न आल्याने ग्रामीण पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक सुनील चव्हाण यांनी तपास करून संशयिताला अटक करून गाडीही जप्त केली. संशयिताला असीम नाईक याने दुचाकीचा क्रमांक एमएच०८-एव्ही५७६८ बदलून एमएच ०८- एझेड ७०७९ असा केला होता. आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलिसांचे विशेष सहाय्यक सरकारी वकील निलांजन नाचणकर यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली असून ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 06/Dec/2024