देवरूख : श्री सद्‌गुरू लोकमान्य वाचनालयात उद्या ‘भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार’ या विषयावर व्याख्यान

देवरूख : शहरातील श्री सद्‌गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने दि. ७ रोजी बीड अंबाजोगाई येथील प्रा. शरद हेबाळकर यांचे ‘भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. हेबाळकर यांचा भारतीय संस्कृतीवर गाढा अभ्यास आहे. त्यांनी अनेक ठिकाणी या विषयावर व्याख्यान दिले आहे. शनिवारी सायंकाळी ठीक ५ वा. श्री सद्‌गुरू लोकमान्य वाचनालय सभागृहात व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष जी. के. जोशी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 06/Dec/2024