रत्नागिरी : येथील अॅड. विलास पाटणे लिखित प्रतिभा आणि प्रतिमा हे चरित्रात्मक पुस्तक माणगाव येथील अशोकदादा साबळे विधी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला गोव्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती अंबादास जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच या वेळी कॉलेजचे विद्यार्थी, माणगाव, रोहा, श्रीवर्धन आणि महाड आदी बारचे वकील उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवारी (ता. ७) सकाळी १०.३० वाजता अशोकदादा – साबळे विधी महाविद्यालयात होणार आहे. या कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक अॅड. विलास पाटणे उपस्थित राहणार आहेत. तसेच माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजीव साबळे, माणगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. महेंद्र माणकर, कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सोनाली बुरटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. माणगाव परिसरातील नागरिकांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे अध्यक्ष अॅड. विनोद घायाळ यांनी केले आहे.
अॅड. पाटणे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती माधव जामदार, न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या उपस्थितीत झाले होते. प्रतिभा आणि प्रतिमा पुस्तक राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वितरित झाले तर विद्यार्थी व वाचकांना न्यायव्यवस्थेतील प्रतिभावान व्यक्तींच्या चरित्राचा परिचय होईल. या हेतूने राज्यभरात विविध ठिकाणी पुस्तक वितरणाचे कार्यक्रम होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 06/Dec/2024














