High Court Jobs 2024 : उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज?

मुंबई : High Court Jobs 2024 | सरकारी नोकरीच्या (Govt Job) शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. ज्या युवकांची कोर्टात नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालय (Himachal Pradesh High Court Job) लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड तीन, ड्रायव्हर आणि शिपाई या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2024 आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयात नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी 31 डिसेंबरच्या आत अर् भरणं गरजेचं आहे. विहित तारखेच्या आत HP उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट hphighcourt.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकता. अर्ज करण्यापूर्वी, सर्व उमेदवारांनी एकदा पात्रता आणि निकष याबाबतची माहिती hphighcourt.nic.in या वेबसाईटवर पाहू शकता.

एकूण 187 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

एकूण 187 पदांच्या भरतीसाठी ही भरती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे नियमित व कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत लिपिकाची 63 पदे, स्टेनोग्राफर ग्रेड-3 ची 52 पदे, चालकाची 06 पदे आणि शिपाई/चौकीदार/सफाई कर्मचारी यांची 66 पदे भरण्यात येणार आहेत. या सर्व पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 31 डिसेंबरच्या आत अर्ज करणं गरजेचं आहे.

अर्ज करण्यासाठी किती फी भरावी लागणार?

भरतीमध्ये सामील होण्यासाठी, अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांना 347.92 रुपये भरावे लागतील. याशिवाय SC, ST, OBC EWS, PH (केवळ हिमाचल प्रदेशातील राखीव श्रेणीतील उमेदवार) श्रेणीतील उमेदवारांना 200 रुपये जमा करावे लागतील. अर्ज शुल्क ऑनलाइन असेल. भरतीशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार वर दिलेल्या अधिसूचनेच्या लिंकवर क्लिक करू शकतात.

कसा कराल अर्ज?

HP उच्च न्यायालय भर्ती 2024 अर्ज भरण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट hphighcourt.nic.in ला भेट द्या.
यानंतर, भरतीशी संबंधित नवीनतम लिंकवर जा आणि अर्ज/लॉग इन करण्यासाठी येथे क्लिक करा.
आता तुम्हाला नवीन पेजवरील Apply Here लिंकवर क्लिक करावे लागेल.
यानंतर, New Candidate वर क्लिक करा, Register Here आणि विनंती केलेली माहिती भरून नोंदणी करा.
नोंदणीनंतर, उमेदवारांनी इतर सर्व माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
शेवटी, उमेदवारांनी विहित शुल्क जमा करावे आणि भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:45 06-12-2024