Maharashtra Weather : दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी – हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप

Maharashtra Weather Update: राज्याच्या विविध भागात पावसानं (Unseasonal Rain) एकच धुमाकूळ घातला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळं शेतकरी चिंतेत आहेत. या पावसाचा फळपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर नव्याने स्थापन झालेल्या फडणवीस सरकार समोर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच झालेल्या नुकसानचे आव्हान आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर आगामी काळातही सतर्क राहण्याचे आदेश भारतीय हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना दिले आहे.

अशातच या बाबत हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी यावर भाष्य करताना राज्यात पडत असेला पाऊस अवकाळी नसल्याचे म्हटले आहे. पेंगल समुद्री वादळामुळे बाष्पयुक्त वारे पश्चिम महाराष्ट्राकडे वळल्याने काही भागात पाऊस पडतोय. मात्र या पावसाला अवकाळी पाऊस म्हणता येणार नसल्याचे ते म्हणाले.

यंदाच्या हंगामात राज्यभरात कमी प्रमाणात थंडी

काही दिवसांपूर्वी पुण्यावर शितवाऱ्यांचा प्रभाव होता, त्यामुळे पुण्यात थंडी वाढली होती. मात्र पेंगल या समुद्री वादळामुळे तापमानात वाढ झाली आहे. पुण्यातच नाही तर राज्यभरात यंदाच्या हंगामात थंडी कमी प्रमाणात असणार आहे. विंटर आऊट लुकमध्ये यंदा तीन महिने तापमानात चढ-उतार बघायला मिळणार आहे. साधारण 14 ते 17 अंशापर्यंत तापमान असू शकत. असा अंदाज ही हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी व्यक्त केला आहे.

….तर शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम

पुढील तीन दिवस पुण्यात तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतरचे तीन दिवस पुण्यात शितवाऱ्याचा प्रभाव जाणवणार आहे आणि थंडीत वाढ होणार आहे. पण दरवर्षीपेक्षा यंदा थंडी कमी प्रमाणात असणार आहे. नेहमीच्या वातावरणापेक्षा काही प्रमाणात वातावरणात बदल झाला तर शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम दिसू लागतो. यंदा देखील या पेंगलमुळे पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान होऊ शकत. असा इशाराही एस डी सानप यांनी दिल आहे.

लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

लातूर जिल्ह्यातील अनेक भागात काल(गुरुवारी) मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी वातावरणात गारठा वाढला आहे. लातूर शहर आणि परिसर देवणी शहर आणि परिसर निलंगा तालुक्यातील काही भाग या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यातील देवणी निलंगा तालुक्यातील काही भागांमध्ये मध्यरात्री अचानक पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री अचानक आलेल्या पावसामुळे बाहेर असलेल्या लोकांची तारांबळ उडाली. मध्यरात्री अचानक लातूर जिल्ह्यातील लातूर शहर आणि परिसर देवणी परिसर त्याचबरोबर निलंगा तालुक्यातील खरोसा भाग या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. कव्हा, हरंगुळ, खोपेगाव, सारोळा, बाभळगाव या भागातही रिमझिम पावसाची हजेरी होती. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारठा वाढला आहे. या पावसामुळे पिकावर रोगराई पडण्याची शक्यता दाट झाली आहे. मागील काही दिवसापासून वातावरणात म्हणावा तसा गारवा जाणवत नव्हता. मात्र मध्यरात्री झालेल्या पावसामुळे वातावरणात गारठा वाढला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:08 06-12-2024