मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये जमा करा. शक्य असेल तर ३ हजार रुपये द्या, कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिना ३ हजार रुपये देणार होतो, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून २१०० रुपये देणार आहोत. नवीन वर्ष सुरु होतय. डिसेंबर किंवा जानेवारी, डिसेंबर महिना सुरु झालाय, पण शक्य असेल, तर डिसेंबरपासूनच किंवा १ जानेवारी २०२५ पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना २१०० रुपये जमा करा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:12 06-12-2024