एक दिवस देवेंद्रजी आपल्या देशाचे पहिले मराठी पंतप्रधान होतील.. मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने (Mahayuti) अखेरीस राज्यात सत्ता स्थापन केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (०५ डिसेंबर २०२४ ) मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत. यातच आता एका मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होत आहे.

मराठी अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. फक्त एवढंच नाही तर येत्या काळात देवेंद्र फडणवीस हे देशाचे “पहिले मराठी पंतप्रधान” होतील, असेही भाकीत त्यानं केलं आहे. मराठी अभिनेता अभिजित केळकर याने फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहलं, “…आजच माझ्या मनातल्या भावना व्यक्त करतो…एक दिवस असाही येईल ज्या दिवशी, देवेंद्रजी आपल्या देशाचे “पहिले मराठी पंतप्रधान” होतील… तथास्तु!!! … मनापासून अभिनंदन आणि अनेक अनेक शुभेच्छा Devendra Fadnavis जी”. या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय.

अभिजीत केळकरच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास सध्या तो झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये काम करत आहे. अभिजीत हा समजातील घटनांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसून येतो. समाजातील गंभीर मुद्द्यांवर अगदी निर्भिडपणे तो त्याच मत मांडतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:12 06-12-2024