ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी करिअरसाठी पुढे यावे : प्रा. चेतन गोडबोले

राजापूर : ग्रामीण भागातील मुलांतील जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी पाहता या तरुणाईला करिअरच्या सर्वाधिक संधी आहेत. त्यासाठी तरुणाईने पुढे यावे, असे आवाहन निलया फाऊंडेशनचे प्रा. चेतन गोडबोले यांनी केले. श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभाग आणि निलया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘करिअर गाईडन्स’ या विषयावर ते बोलत होते.

महाविद्यालयाच्या विविध विभागातून विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण करतात. पण आपले नेमके ध्येय ठरवत नाही. करिअरच्या सर्वाधिक संधी कॉमर्स विभागातून आहेत; पण त्याविषयीचे अधिक ज्ञान आपण घेत नाही.

निलया एज्युकेशन फाऊंडेशन ग्रामीण भागातील मुलांना या विविध संधी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करते. यावेळी व्यासपीठावर स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ. ए. डी. पाटील होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविक पर मनोगतातून डॉ. ए. डी. पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. यावेळी निसर्गा धावडे, नेत्रा बावकर, अमेय सावंत आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ए. डी. पाटील यांनी केले तर आभार डॉ. व्ही. एस. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 07/Dec/2024