मुंबई : CM Devendra Fadnavis on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी लोकसभेच्या निवड़णुकीत आम्हाला खुल्या दिलानं पाठिंबा दिला होता. त्याचा आम्हाला फायदादेखील झाल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं.
पण विधानसभेला (Vidhansabha) त्यांच्यासमोर देखील प्रश्न होता. त्यांचा महाराष्ट्रात वेगळा पक्ष आहे. त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा? आमच्याकडे राज ठाकरे यांना देण्यास जागा नव्हत्या. कारण आम्ही तीन पक्ष होतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही सगळी वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस म्हणाले.
महापालिकेच्या निवडणुकीत जिथं शक्य तिथं राज ठाकरेंना सोबत घेऊ
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे प्रवाहाच्या विरोधात लढून देखील त्यांना चांगली मते मिळाल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांच्या अनेक उमेदवारांनी चांगली मते मिळाली आहेत. त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात जुळतात. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथं शक्य आहे, तिथं त्यांच्यासोबत एकत्र येण्याचा आम्ही विचार करु असेही फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. आमचे विचार जुळतात असे देखील फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळं आता राज ठाकरे सरकारमध्ये सामील होणार का? पुढच्या काळात होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र निवडणूक लढणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता राज ठाकरे काही प्रतिक्रिया देतात का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
पुढच्या काळात नदीजोड चार नदीजोड प्रकल्पावार माझा भर
दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा प्ल्रन देखील सांगितला आहे. पुढच्या काळात नदीजोड चार नदीजोड प्रकल्पावार माझा भर असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यामुळं कायम दुष्काळमुक्त होईल असे फडणवीस म्हणाले. तसेच ग्रीन एनर्जीवर देखील माझा भर राहणार आहे. 2030 मध्ये 52 टक्के वीज ग्रीन एनर्जी असेल असंही फडणवीस म्हणाले. याचा शेती उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. यामुळं रोजगाराची निर्मिती होईल, अर्थव्यवस्थेला विशेष चालना मिळेल असेल असे फडणवीस म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 07-12-2024