मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु होत असून नवनिर्वाचित आमदार विधानभवनात पोहोचत आहेत. शिवसेनेचे नेते माजी मंत्री उदय सामंत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
ते म्हणाले की मंत्रिमंडळाचा विस्तार योग्यवेळी मुख्यमंत्री करतील. तीनही नेते मंत्रिमंडळा बाबत चर्चा करतील. सभापती निवडीसंदर्भात सर्व निर्णय लवकर होतील, असंही ते म्हणाले.
भाजप आणि मनसेच्या युतीसंदर्भातील देवेंद्र फडणवीस यांच्या युतीसंदर्भात विचारलं असता उदय सामंत यांनी हा त्यांचा निर्णय असू शकतो, असं म्हटलं. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेशी देखील चर्चा करतील, असं उदय सामंत म्हणाले. मंत्रिपदाचं वाटप कसं होणार हे शिवसेनेच्या बाबतीत एकनाथ शिंदे निर्णय घेतील. महायुतीबाबत तीन नेते एकत्र बसून निर्णय घेतील.
शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही काम करु आणि कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी प्रयत्न करु, असंही सामंत म्हणाले.
विधानसभेत पहिल्यांदा असा दिवस की कोकणातून एका कुटुंबातून सख्खे भाऊ विधानभवनात आले आहेत. मी आणि माझा मोठा भाऊ विधानसभेत आलो आहे. तसेच तसेच निलेश राणे आणि नितेश राणे देखील विधानसभेत आले आहेत. आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई याचंही अभिनंदन असं उदय सामंत म्हणाले.
कोकणातून आम्ही दोन राणे दोन सामंत असे निवडून आलोय. एका घरातले भाऊ निवडून येतात तेव्हा आनंदच होतो, असं उदय सामंत म्हणाले.
उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकरणाबाबत अधिक भाष्य करणं टाळलं. अजित पवारांना दिलासा मिळाला याबाबत काही माहिती नाही असं सामंत म्हणाले. अजित पवारांबाबत मला माहिती घ्यावी लागेल, असंही ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती मविआ नेत्यांना राहील. ते देखील सहकार्य करतील, असं उदय सामंत म्हणाले. मविआ देखील परंपरा जपण्यास सहकार्य करतील, असं उदय सामंत म्हणाले. गृह खात्यासंदर्भात विचारलं असता, कोणत्याही खात्यावरुन ओढाताण सुरु नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेतील. आम्ही गृह खातं मागितलं, इतर खाती मागितली आहेत, त्याबाबत चर्चा अमित शाह यांच्यासोबत होईल, एकनाथ शिंदे चर्चा करतील. जे काही होईल ते समन्वयानं होईल, असं उदय सामंत म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 07-12-2024