महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणारा संशयित सहा तासांत गजाआड

गुहागर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ वेळंब रोड येथून सुमारे २ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काळसूर कौढर रोडवरील शिगवण सडा या ठिकाणी श्रृंगारी मोहल्ला येथून धुणीभांडी व घरकाम करून कौढर रस्त्याच्यामार्गे आपल्या घरी जात असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या व डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घालून सफेद स्कुटी गाडीवरून एका अनोळखी पुरुषाने फिर्यादी यांच्या शेजारी गाडी उभी करून फिर्यादी महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून संशयित आरोपी फरार झाला.

सहा तासाच्या अथक प्रयत्नाने सीसीटीव्ही सहाय्याने गुहागर पोलिसांनी आरोपी संकेत सदानंद जाधव रा. नरवण ( वय ३१) याला गुहागर येथे गजाआड केले. फिर्यादी यांनी गुहागर पोलीस स्टेशन येथे त्वरित गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांना त्याला लवकर पकडण्यात यश आले. पोलिसांनी भा.द.वि.कलम ७४,७९ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास हे.कॉ. नलावडे करत आहेत.

संशयित आरोपीला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजित सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक भोपळे, पोलीस हवालदार वैभव चोगले, कुमार घोसाळकर, प्रीतेश रहाटे यांनी कामगिरी बजावली. सहा तासांत पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 07-12-2024