खेड : कोकण मार्गावर विदर्भातून धावणाऱ्या नागपूर- मडगाव स्पेशलला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. ही स्पेशल २९ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. या स्पेशलला आणखी मुदतवाढ देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार स्पेशलला मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. आठवड्यातून दर बुधवार व शनिवारी आणि परतीच्या प्रवासात मंगळवार व रविवारी धावणारी स्पेशल कोकणातील प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. नागपूर विदर्भातील प्रवाशांसाठीही स्पेशल किफायतशीर ठरत असल्याने प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्पेशलला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 07/Dec/2024














