India vs Australia 2nd Test Day 2 Stumps :ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियाचा दुसरा अंक अर्थात दुसरा डावही कोलमडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघानं पहिल्या डावात ३३७ धावा करत १५७ धावांची आघाडी घेतली आहे.
ही आघाडी भेदून टार्गेट सेट करण्याचं मोठं आव्हान घेऊन टीम इंडियानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पण पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि स्टार्कच्या भेदक माऱ्यानं दुसऱ्या दिवसाच्या अखेऱच्या षटकात टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला. लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल या सलामीवीरांसह शुबमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात माघारी फिरले आहेत. त्यांनी ठराविक अंतराने ज्या प्रकारे विकेट्स गमावल्या ते पाहून पिंक बॉल टेस्टच्या दुसऱ्या डावातही आघाडीच्या फलंदाजीतील मंडळींचा “तू चल मी आलोच” असाच काहीसा सीन पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ५ बाद १२८ धावा केल्या होत्या. रिषभ पंत आणि नितीशकुमार रेड्डी ही जोडी मैदानात असून भारतीय संघ अजूनही २९ धावांनी पिछाडीवर आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:29 07-12-2024














