रत्नागिरी : रत्नागिरीतील डीमार्ट समोरील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर असलेल्या खड्डयांमुळे सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायूगळती होऊन झालेल्या मोठ्या आवाजाने घबराट पसरली. घटनेनंतर एमआयडीसी आणि नगर परिषद अग्निशमन पथकांनी तातडीने धाव घेतल्याने वायूगळतीवर नियंत्रण मिळवित मोठा अनर्थ टाळला.
या दुर्घटनेमुळे तासभरापेक्षा जास्त काळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. कुवारबावकडून रत्नागिरीकडे मुख्य मार्ग खड्डेमय रस्त्यावरून गॅस टँकर (क्र.7079) रत्नागिरीच्या दिशेने येत होता. शनिवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा टँकर कुवारबाव परिसरातील डी मार्ट समोरील ठिकाणी येता त्यातून मोठय़ा प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. दोन व्हॉल्व्हमधून ही गॅस गळती सुरू होती. इतर वाहनधारकांची देखील यामुळे पळापळ झाली. टँकरमधील गॅस वेगाने बाहेर पडत होता.
या गॅस गळतीवर नियंत्रण राखण्यासाठी व अनर्थ टाळण्यासाठी लगोलग अग्निशमन पथकांना पारण करण्यात आले. पोलीस यंत्रणाही दाखल झाली. यामुळे मार्गावर मोठी वाहतूकी कोंडी झाली. एमआयडीसी अग्निशमन पथकाचे अधिकारी सुरेश गोल्लार व त्यांची टीम तसेच नगर परिषद अग्निशमन पथकातील नरेंद्र मोहिते, शिवम शिवलकर, यश वालम, तसा पोलिस दलाचे कर्मचारी संतोष गायकवाड, लक्ष्मण कोकरे हे देखील घटनास्थळी धावले. गॅसवाहू टँकरमधून गळती होणारा गॅस थांबविण्यासाठी तत्काळ प्रयत्न हाती घेण्यात येऊन त्या गळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 09-12-2024












