चिरा घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी होऊन अपघात; एकाचा मृत्यू

रत्नागिरी : जांभा चिरा घेऊन एक ट्रक तालुक्यातील जाकादेवी ते परचुरी (ता. संगमेश्वर) असा जात होता. मात्र, उक्षी रेल्वे स्टेशन जवळील उतारावर येताच या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रकचा अपघात झाला. ही घटना शनिवार 7 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा. सुमारास घडली. या अपघातामध्ये ट्रक मधील पाचजण जखमी झाले. त्यातील एकाला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारांदरम्यान त्याचा शनिवारी मृत्यू झाला. सिधू चव्हाण असे या अपघातातील मृताचे नाव आहे.

सिधू मोतीराम चव्हाण (32, रा. चवे, चिरेखाण, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ट्रक चालक अनंत राठोड हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-10-एडब्ल्यू-2757) घेऊन शनिवारी दुपारी जाकादेवी ते परचुरी (ता. संगमेश्वर) असा जात होता. तो उक्षी रेल्वस्टेशन रस्त्यावरील उतारातील वळणावर आला असता अचानकपणे ट्रकचे ब्रेक निकामी झाले आणि हा अपघात झाला.

या अपघातील सिधू चव्हाण व अन्य पाचजण खाली पडले. त्यामध्ये सिधूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर इतर पाचजण किरकोळ जखमी झाले. सिधूला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता रविवार 8 डिसेंबर रोजी सकाळी 7.45 वा. सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 09/Dec/2024