खेड : नातूनगर मोहल्ला येथे दोन ठिकाणी घरफोड्या; ४ लाखांचा ऐवज लंपास

खेड : तालुक्यातील नातूनगर मोहल्ला येथील बंद घर चोरट्यानी फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ४ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. ६) घडली. या प्रकरणी चोरट्या विरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्ताक सिराज कोंडेकर (वय ४६ वर्षे, व्यवसाय रिक्षा, मूळ रा. नातुनगर मोहल्ला ता. खेड, सध्या जबल अलनुर, डाकबंगला, खेड) यांनी चोरीची तक्रार दिली आहे. कोंडेकर यांच्या नातूनगर मोहल्ला येथील घराचे समोरील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील दोन लोखंडी कपाटाचे दरवाजेही हत्याराने उघडले. कपाटामधील सोन्या-चांदीचे २ लाख ६० हजार रुपयांचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी कोंडेकर यांचा चुलत भाऊ तौसिफ मकबुल कोंडेकर याच्या घराकडे मोर्चा वळविला. त्यांच्या घरातील दोन लोखंडी कपाटे फोडली. अन् त्यातील सोन्या-चांदीचे १ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 09/Dec/2024