रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या जिल्हा सचिव संघटनेचा प्रथम वर्धापन दिन जल्लोषात साजरा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सचिव संघटनेला दिनांक ८/१२/२०२४रोजी वर्षपूर्ती होत असून त्यानिमित्ताने प्रथम वर्धापन दिन सोहळा गुरुकृपा मंगल कार्यालय रत्नागिरी येथे दिमाखात पार पाडला.

गेली अनेक वर्ष सचिव संघटना तयार होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सचिव प्रयत्न करत होते परंतु या संघटनेची मुहूर्तमेढ रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सचिवांच्या प्रयत्नाने व संघटनेचे अध्यक्ष श्री विठोबा भोसले, उपाध्यक्ष श्री सुनील लोगडे, सचिव श्री प्रविण राऊत व पदाधिकारी श्री अनंत ठीक, श्री दिवाकर पाटिल, श्री प्रभाकर मयेकर, श्री प्रदिप कामतेकर, श्री मधुकर जाधव, सौ कावेरी साळवी, सौ प्रियांका भाटकर, श्री मनोज बाने, श्री प्रदिप लिगायत यांच्या प्रयत्नाने संघटना स्थापन करण्यात आली. संघटना स्थापन करण्याकरिता श्री मधुकर ऊर्फ आबा टिळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संघटनेच्या पहिल्या वर्धापन सोहळ्यास प्रमुख अतिथी श्री गजानन उर्फ आबा पाटिल, श्री रामभाऊ गराटे संचालक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा संघाचे व्यवस्थापक श्री रोहन कांबळे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थपक श्री नरेंद्र जाधव, श्री विठ्ठल गंगावणे संघटनेचे अध्यक्ष उपाधक्ष सचिव व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सचिव सभासद उपस्थित होते.

सर्व कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री संदीप घावली यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 09-12-2024