चिपळूण : राज्यभरात वंचित बहुजन आघाडी ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवित आहे. याचा प्रारंभ नुकताच चिपळुणातून करण्यात आला. यावेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला. राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा असल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यानुसार वंचितकडून ईव्हीएम मशिन हटावसाठी सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेस अॅड. आंबेडकर यांच्या स्वाक्षरीपासून सुरुवात करण्यात आली. १६ डिसेंबरपर्यंत राज्यभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव यांनी केले आहे. यावेळी सुशांत जाधव, सुमेय जाधव, शक्ती जाधव, महेश सावंत, विनोद कदम, मनोहर मोहिते, सुमेध जाधव, बबन मोहिते, नीलेश जाधव यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 09/Dec/2024