रत्नागिरी : विठ्ठल मंदिरासमोरील इमारत पाडण्याचे काम सुरू

रत्नागिरी : रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर समोरच्या व्यापारी गाळे असलेल्या इमारतीचे तोडकाम सुरू झाले आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची ही इमारत असून अनेक गाळेधारकांनी त्यांचे गाळे रनपच्या ताब्यात दिल्यानंतर ही इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले.

रत्नागिरी न.प.च्या मालकीची विठ्ठल मंदिर समोरील इमारत फार जुनी – असल्याने धोकादायक बनली होती. या इमारतीतील गाळे ताब्यात देण्याबाबत स्नपने गाळेधारकांना नोटीस बजावली. याविरुद्ध काही गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली.

गाळेधारक इमारतीतील पावसाळ्यात या इमारतीवर रनपने धोक्याचा इशारा देणारा फलक लावला, फलकरूपी या नोटीसला प्रतिसाद म्हणून गाळेधारकांनी गाळ्यांमधील साहित्य बाहेर काढले. ताब्यात देण्याची कार्यवाही केली. त्यानंतर ही धोकादायक इमारत पाडण्याच्या कामाला प्रारंभ केला असल्याचे न.प. मालमत्ता विभागाचे अधिकारी नंदकुमार पाटील यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 27/Sep/2024