बँकेचे सील तोडून घरात प्रवेश करणाऱ्या चौघांवर गुन्हा

चिपळूण : जनता सहकारी बँकेच्या चिपळूण शाखेने ताब्यात घेऊन सील लावलेल्या घरात कर्जदार व गहाणखतदार यांनी सील तोडून प्रवेश केला. बँकेला कोणतीही कल्पना न देता त्याचे कुलूप तोडून प्रवेश केल्याची ही घटना गेल्या २२ नोव्हेंबर रोजी घडली.

या प्रकरणी चौघांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम चांद मुलाणी, एक महिला, अल्ताफ चांद मुलाणी, अस्लम चांद मुलाणी (सर्व रा. नाझनीन पार्क, सोसायटी शबनम अपार्टमेंट, चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबतची फिर्याद बँकेचे शाखाधिकारी श्रीरंग मोहन चितळे (६३, बेंदरकर आळी, चिपळूण) यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 09-12-2024