चिपळूण : ग्लोबल टुरिझम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन चिपळूणच्या विकासावर चर्चा केली. केवळ चर्चा नको तर विकासाचे निवेदन घेऊन या. पाठपुरावा करा मी निधी देण्यास सक्षम आहे, असे खासदार राणे यांनी ग्लोबलच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
चिपळूण येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे दर्शन घेण्याकरिता खासदार राणे रविवारी (ता. १५) चिपळूणला आले होते. या वेळी ग्लोबल टुरिझम संस्थेचे संजीव अणेराव, राम रेडीज, शहानवाज शहा, अशोक भुस्कुटे आदींनी खासदार राणे यांची भेट घेतली.
तालुक्यात सुरू असलेली जंगलतोड थांबवणे, जंगलतोडीला कार्बन क्रेडिट हा पर्याय देणे, जंगल व जंगलक्षेत्र वाढवणे, तालुक्यात पर्यावरणपूरक उद्योग आणणे, नदीचा विकास तसेच नदीतील गाळ काढणे, पर्यटनवाढीसाठी विमानतळ, गोवळकोट ते लोटे वाशिष्ठी खाडीवरून रोपवे तयार करणे, नदीचा प्रवाह वाढवणे आदी विषयांवर खासदार राणे यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. नदी विकास विषयावर शहा यांनी राणे यांना विस्तृत माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 17-09-2024