गुहागर : गुहागर तालुक्यातील मौजे असोरे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, गुहागर यांच्या मार्फत जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माती नमुना कसा काढावा यासोबतच जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्त्व व त्यानुसार खतांचा योग्य वापर याबाबत माहिती देण्यात आली. तसेच कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, पी एम किसान अशा विविध योजनांची माहिती कृषि सहाय्यक उमेश स्वामी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 09/Dec/2024














