रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे रत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शन ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, ऋषीकेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धनराज डी. विसपुते, मातोश्री कमलबाई विसपुते प्रशालेच्या संचालिका नंदा प. शेलार, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार, रत्नागिरीचे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनामध्ये ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजता नाव नोंदणी व प्रकल्प मांडणी केली जाईल. १० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत विज्ञान दिंडी, सकाळी १०.३० ते ११ वाजता मुख्य उद्घाटन समारंभ, दुपारी २ ते सायंकाळी ५.३० यावेळेत प्रश्नमंजूषा व मूल्यमापन होईल, तर ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १०.३० यावेळेत साहित्य मूल्यमापन, सकाळी १०.३० ते ११.०० प्रदर्शन पाहण्यासाठी खुले, दुपारी २ ते सायंकाळी ५.३० बक्षीस वितरण समारंभ होईल.
प्रदर्शनाला सर्व विज्ञानप्रेमींनी उपस्थित राहून वैज्ञानिक प्रतिकृतींची पाहणी करावी आणि वैज्ञानिक विचारमंथनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 09-12-2024














