राजापूरमधून निवडून आलेल्या किरण सामंतांनी घेतली आमदारकीची शपथ

रत्नागिरी : मी किरण स्वरुपा रवींद्र सामंत अशी सुरुवात करीत किरण उर्फ भैया सामंत यांनी विधानसभेत रविवारी आमदारकीची मराठीत शपथ घेतली. निवडणुकीपूर्वीच त्यांनी राजापूर मतदारसंघातील गावागावातून जात, ग्रामीण भागातील मतदारांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. एकदा शब्द दिला म्हणजे काम होणारच आणि काम होणार नसेल तर नाही, अशी किरण उर्फ भैय्या सामंत यांची भूमिका आहे.

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूकीपूर्वी फिरताना सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांचे छोटे-मोठे प्रश्न त्यांनी सोडवण्यावर भर दिला. मतदारांनीही त्यांच्या या कामावर विश्वास ठेवत तब्बल 20 हजारहून अधिक मतांनी किरण सामंत यांना विजयी करीत विधानसभेत पाठवले.

रविवारी विधानसभेत गेलेल्या किरण सामंत यांनी आमदारकीची शपथ घेतली. राजापूर मतदारसंघात विकास कामाची गंगा आणणार असून विकास कामांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 09-12-2024