रत्नागिरी : सोनसाखळी घालायला मागितल्याच्या रागातून पत्नीला मारहाण

रत्नागिरी : तालुक्यातील पावस दखनी मोहल्ला येथे बँकेतून सोडवून आणलेली चेन घालण्यास मागितल्याच्या रागातून पतीने पत्नीला जबर मारहाण केली. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११. वा. सुमारास घडली. याप्रकरणी पत्नीने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पतीविरोधात पोलिसात तक्रार दिली. आसिफ शौकत म्हालदार (रा. दखनी मोहल्ला पावस, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पीडित पत्नीच्या तक्रारीनुसार आसिफ म्हालदारने बँकेत ठेवलेली सोन्याची चेन सोडवून आणली होती. ती चेन पत्नीने गळ्यात घालण्यासाठी मागितली. याचा राग आल्याने त्याने तिला शिवीगाळ करत लाथा बुकक्यांनी तसेच हातांच्या ठोशांनी जबर मारहाण केली. तिने जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दिली. हा गुन्हा शून्य नंबरने पूर्णगड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 09/Dec/2024