रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या आज कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघ भवनात झालेल्या सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सुभाष थरवळ यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली.
या सभेत २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी मारुती अंब्रे, सचिव राजेंद्र कदम, सहसचिव दीनानाथ सरपोतदार आणि कोषाध्यक्षपदी श्यामसुंदर सावंत यांची निवड झाली.
समितीचे अध्यक्ष श्री. थरवळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सभेची सुरुवात खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती अंब्रे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेत अनेक सदस्यांनी सहभाग घेतला.
सभेला जिल्ह्यातील विविध ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात श्री. थरवळ यांनी समितीने वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. शेवटी श्री. श्याममसुंदर सावंत यांनी आभार मानले.
यजमान कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाने सभेचे नियोजनबद्ध आयोजन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 09-12-2024













