ब्रेकिंग : Rahul Narvekar | राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी (Maharashtra Vidhan Sabha Speaker) पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.

त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे अॅड. राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष ठरले आहे.

यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे 1962 आणि 1967 असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते. तसेच सयाजी सिलम हेही दोनवेळा अध्यक्ष होते, पण त्यांचा एक कार्यकाळ हा संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीचा होता. संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे 11 वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा, भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे. आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळेल. आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणुन राहूल नार्वेकर यांची निवड करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. यानंतर अनिल पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

संयुक्त महाराष्ट्रात आजवर कुणाकुणाला मिळाले पद?

अध्यक्षांचे नावकार्यकाळराजकीय पक्ष
सयाजी सिलम१ मे १९६० ते १२ मार्च १९६२काँग्रेस
बाळासाहेब भारदे१७ मार्च १९६२ ते १३ मार्च १९६७काँग्रेस
बाळासाहेब भारदे१५ मार्च १९६७ ते १५ मार्च १९७२काँग्रेस
बॅ. शेषराव वानखेडे२२ मार्च १९७२ ते २० एप्रिल १९७७काँग्रेस
बाळासाहेब देसाई४ जुलै १९७७ ते १३ मार्च १९७८काँग्रेस
शिवराज पाटील१७ मार्च १९७८ ते ६ डिसेंबर १९७९काँग्रेस
प्राणलाल व्होरा१ फेब्रुवारी १९८० ते २९ जून १९८०काँग्रेस
शरद शंकर दिघे२ जुलै १९८० ते ११ जानेवारी १९८५काँग्रेस
शंकरराव जगताप२० मार्च १९८५ ते १९ मार्च १९९०काँग्रेस
मधुकरराव चौधरी२१ मार्च १९९० ते २२ मार्च १९९५काँग्रेस
दत्ताजी नलावडे२४ मार्च १९९५ ते १९ ऑक्टोबर १९९९शिवसेना
अरुण गुजराथी२२ ऑक्टो. १९९९ ते १७ ऑक्टो. २००४राष्ट्रवादी
बाबासाहेब कुपेकर६ नोव्हेंबर २००४ ते ३ नोव्हेंबर २००९राष्ट्रवादी
दिलीप वळसे पाटील११ नोव्हेंबर २००९ ते ८ नोव्हेंबर २०१४राष्ट्रवादी
हरीभाऊ बागडे१२ नोव्हेंबर २०१४ ते २५ नोव्हेंबर २०१९भाजप
नाना पटोले१ डिसेंबर २०१९ ते ४ फेब्रुवारी २०२१काँग्रेस
राहुल नार्वेकर३ जुलै २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२२भाजप

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 09-12-2024