रत्नागिरी : मुंबई-गोवा महार्गाचे काम काही ठेकेदारांमुळे रखडले आहे. २०१२ पासून हे काम सुरू आहे. याला महायुतीचे एकच सरकार जबाबदार नाही. या महामार्गाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्र्यांनी देखील खेद व्यक्त केला. परंतु आता डिसेंबर २०२४ पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नुकत्याच झालेल्या चिपळूण दौऱ्यावर आलले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई गोवा महामार्गाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार आले, तर या रखडलेल्या महामार्ग पूर्ण करण्यात येईल, असे त्यांना सांगितले होते. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले २०१२ मध्ये या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. त्यावेळी शरद पवार यांचे सरकार होते. केंद्रात पवार मंत्री होते. त्या सरकारमध्ये मलाही काम करण्याची संधी लाभली होती.
तेव्हापासून या महामार्गाच्या कामामध्ये काही स्थानिकांचे प्रश्न, ठेकेदारांचे प्रश्न, तसा भूसंपादनाच प्रश्न होते. तसे अजूनही काही दावे न्यायालयात चालू आहेत. महामार्गाच्या कामातील काही ठेकेदारांनी चुकीची कामे केल्यामुळे महामार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे शरद पवार जर कामाबाबत नाराजी व्यक्त करत असतील तर त्याला एक सरकार जबाबदार असू, शकत नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठरवण्याबाबत संदेश
सामंत म्हणाले, ‘पवार यांनी महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला मुख्यमंत्री ठरवण्याबाबत योग्य तो मेसेज दिलेला आहे. स्वतः मुख्यमंत्री ठरवणे अयोग्य आहे. त्यामुळे कुणीही धावाधाव करू नये, असा पवार यांनी संकेत दिलेला आहे. ज्या पक्षाचे संख्याबळ अधिक त्यांचा मुख्यमंत्री अशी शक्यताही पवार यांनी व्यक्त केली. पण काँग्रेसची काही अतिउत्साही लोकं मुख्यमंत्री झाल्याच्या अर्विभावात फिरत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.’
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 27/Sep/2024