साडवली : देवरुख क्र. २ चे विस्तार अधिकारी तानाजी नाईक यांनी एक आदर्श सर्वासमोर ठेवला आहे. शिष्यवृती परीक्षेचा बीटचा निकाल १००% लागला. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी त्यांनी सराव चाचण्यांचे आयोजन केले. त्यातील पहिल्या सराव चाचणी पेपरचा खर्च स्वतः करून बीट मधील विद्यार्थी, शिक्षक यांच्या पुढे आदर्श ठेवला आहे. ही चाचणी नुकतीच देवरुख क्र. २ या बीट शाळेत घेण्यात आली. यावेळी देवरुख क्र. २ केंद्रप्रमुख निकिता नलावडे, मारळ केंद्र प्रमुख राजेंद्र कदम, निवे खुर्द केंद्र प्रमुख सुनिल करंबेळे, बीट मुख्याध्यापिका सीमा यशवंतराव, मार्गदर्शक शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. ही चाचणी यशस्वी करण्यासाठी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव, संदेश धुमाळ, कानर, गजानन रावणंग यांनी परिश्रम घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 09/Dec/2024













