पावस : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनअंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीने सेंद्रिय शेतीचे दुसऱ्या वर्षातील पहिले प्रशिक्षण पूर्ण केले. २०२३-२४ मध्ये हातखंबा पंचक्रोशीमधील नऊ गावांमध्ये दहा शेतकरी गट स्थापन करून रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीने नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले. त्याअंतर्गत हे प्रशिक्षण घेण्यात आले. मागील वर्षी प्रत्येक गटातील चार महिलांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली तसेच कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ, कोल्हापूर येथे सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण घेतले.
यावर्षीही सर्व गटांमधील सदस्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवळी, हातखंबा, कापडगाव, वेळवंड, पाली, कळके, साठरेबांबर, कशेळीकोंड, नाणीज या गटामध्ये समाविष्ट महिलांना सेंद्रीय शेतीचे गावपातळीवर प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये विविध सेंद्रिय निविष्ठा जसे जीवामृत, दशपर्णी अर्क, गांडूळखत तयार करण्याविषयी माहिती देण्यात आली. वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय स्तरावरून अधिकाऱ्यांनी ही भेट देऊन मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी विनोद हेगडे, नित्यानंद भोसले, प्रमोद पाटील, स्मार्ट प्रकल्पाचे तंत्र अधिकारी डांग यांनी मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 09/Dec/2024













