मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांना या पाच वर्षात मुख्यमंत्रीपद मिळालं तर चांगलंच होईल, असं वक्तव्य त्यांचे पुत्र जय पवार (Jai Pawar) यांनी केलं आहे. ते बारामतीत बोलत होते. जय पवार बारामती विधानसभा मतदारसंघात आभार दौरा करत आहेत.
अजित पवारांना भरघोस यश मिळाल्यानंतर जय पवार मतदारसंघात आभार दौरा काढतायेत. या आभार दौऱ्याची सुरुवात बारामती तालुक्यातील मळद गावातून केली. यावेळी त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मी बारामतीमध्येच असणार
तीन दिवस मी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती असल्याचे जय पवार म्हणाले. मी बारामतीकरांसाठी कायम इथेच असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मी इथेच असणार आहे. युवकांचे अशा स्थान म्हणून मी सगळ्यांना मदत करीन. आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देत आहोत, आम्हाला देशात पक्ष वाढवायचा आहे असंही जय पवार म्हणाले.
मालमत्तेबाबतचा निर्णय कोर्टाने घेतलाय
बारामतीत विजयानंतर आमच्या लोकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावरती मार्ग काढणार असल्याचे जय पवार म्हणाले. अजित पवारांच्या नागरी सत्काराचं आयोजन पार्थ दादा आणि इतर आमचे सहकारी पार पाडणार आहेत. त्याची तयारी सुरु असल्याचे जय पवार म्हणाले. मालमत्तेबाबतचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. कायदेशीर निर्णय असल्याचे जय पवार म्हणाले. कारवाई आधीपासूनच सुरू होती. ज्यावेळेस दादा विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस कारवाई चालू होती. दादा उपमुख्यमंत्री असताना देखील त्यावर ती कारवाई होत होती. आता निकाल आलेला आहे, दादा भाजप सोबत गेले म्हणून काही फरक पडला नाही कोर्टाने निकाल तसा दिलेला आहे असे जय पवार म्हणाले. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे. पण भाजपचा स्ट्राईक रेट चांगला होता. त्यानंतर आमचा होता आणि त्यानंतर शिवसेनेचा होता. महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतला की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे असे जय पवार म्हणाले. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. 237 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला यामधील 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 09-12-2024