संगमेश्वर : कसबा कर्णेश्वर महोत्सवात सोनिया परसुरे यांच्या कथ्थक नृत्याला रसिकांची दाद

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा कर्णेश्वर महोत्सवाच्या तिसऱ्या वर्षातील दुसरा दिवस सोनिया परसुरे यांच्या नृत्य आविष्काराने पार पडला. सोनियांनी आपल्या साथीदारांच्या साथीने केलेले कथ्थक नृत्य आविष्काराचे सादरीकरण खूप बहारदार झाल्याने हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या मनाला भावला. त्यामुळे रसिकांनी मनमुराद आनंद लुटून नृत्याला दाद दिली.

सावर्डे येथील सह्याद्री संस्था आर्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपली आर्ट गॅलरी रसिक प्रेक्षकांसाठी उभारली आहे. त्या विद्यार्थ्यांपैकी व धामणीवासीय प्रथमेश उमेश लिंगायत या विद्याथ्यनि सोनिया परसुरेंचा प्रत्यक्ष कथ्थक नृत्य आविष्कार सुरू असतानाच त्यांचे सुंदर असे चित्र (स्केच) रेखाटले. समारोप प्रसंगी उपस्थित रसिक तसेच वाद्य कलावृंद यांच्या साक्षीने व निबंध कानिटकर, श्रीनिवास पेंडसे यांच्या उपस्थितीत प्रथमेश याच्याहस्ते हे स्केच सोनिया परसुरे यांना प्रदान करण्यात आले. हे स्केच पाहून सोनिया परसुरे देखील भारावून गेल्या. त्यांनी तसेच उपस्थितांनी प्रथमेश याच्या कलेचे कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 09/Dec/2024