खेड : खेड-भोस्ते रेल्वेस्थानक मार्गावर ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चुनही या मार्गाची चाळण झाली आहे. याच मार्गावरून प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही सातत्याने प्रवास सुरू असतो. मार्गाच्या डागडुजीसाठी संबंधित खात्याला आदेश देण्याची तसदी घेतली जात नसल्याने वाहनचालकांची कसरत कायम आहे.
रेल्वेस्थानकात ये-जा करण्यासाठी या मार्गाचा वापर होतो याशिवाय रिक्षा व्यावसायिकांच्यादृष्टीनेही हा मार्ग सोयीचा ठरत आहे. ग्रामसडक योजनेतून वेरळ-भोस्ते कोंडिवली शिवमार्गावर तब्बल ९ कोटींहून अधिक रुपयांचा खर्च करून खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत कायमच आहे. रस्त्याच्या कामास प्रारंभ झाल्यापासूनच कामाच्या दर्जाबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले होते. या मार्गावरील दर्जाहीन कामाबाबत ग्रामस्थांनी सातत्याने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनदेखील ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रताप केला आहे. याचा फटका प्रवाशांना बसत असून, खड्ड्यांमुळे अपघातही घडत असल्याने वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 09/Dec/2024