उदय सामंत यांनी मांडला सरकारचा विश्वासदर्शक ठराव, आवाजी मताने विश्वास दर्शक ठराव मंजूर

मुंबई : Government vote of confidence : महाराष्ट्र सरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मताने मंजूर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रसचे दिलीप वळसे-पाटील, भाजप आमदार संजय कुटे आणि आमदार रवी राणा यांनी सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडला होता.

यावेळी आवाजी मताने विश्वास दर्शक ठराव मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास करत आहे, अशा पद्धतीनं हा ठराव मांडण्यात आला होता. आवाजी मताने हा ठरवा मंजुर करण्यात आला आहे. या विधानसभा निवडणुकीत मुहायुतीला मोठं यश मिळालं आहे. 288 पैकी 232 जागा महायुतीच्या निनवडून आल्या आहेत. त्यामुलं पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. यामध्ये 132 जागा या एकट्या भाजपला मिळाल्या आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.

विधानसभेच्या अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस

विधानसभेच्या अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवशी राहिलेल्या 8 आमदारांनी शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी (Maharashtra Vidhan Sabha Speaker) पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, विधानसभेत अध्यक्षांची निवड होत असताना शिवसेना ठाकरे गटाचा (Shivsena UBT) एकही आमदार सभागृहात उपस्थित राहिला नाही, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 09-12-2024