चिपळूण : जिल्हा परिषद, रत्नागिरी, पंचायत समिती चिपळूण व सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे आंबतखोल येथे ५२ वे चिपळूण तालुका विज्ञान प्रदर्शन व मेळावा ११, १२ व १३ डिसेंबर रोजी होणार आहे.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन १२ रोजी स. १० वा. चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होईल. यावेळी आ.भास्कर जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एस. कासार, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, सह्याद्रि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सचिव महेश महाडिक उपस्थित राहणार आहेत. तर पारितोषिक वितरणासाठी उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजेंद्र कुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे, सहायक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड यांसह अन्य उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनामध्ये चिपळूण तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालये यांचा सहभाग असणार आहे. ११ रोजी दु. १ ते ३, विज्ञान साहित्य मांडणी व मेळावा, दु. ३ ते ४ प्रा. मंगेश राजाराम भोसले, प्राचार्य सह्याद्री पॉलिटेक्निक, यांचे व्याख्यान, १२ रोजी स. ९ ते १० विज्ञान दिंडी, स. १० ते ११.३० उद्घाटन समारंभ, ११.३० ते ५ खुले प्रदर्शन पाहणी व प्रतिकृती परीक्षण, दु. १.३० ते ५ प्रश्नमंजुषा, १३ रोजी स. ११ ते १ निमंत्रित विज्ञान नाटिका सादरीकरण, दु. ३ ते ४ बक्षीस वितरण समारंभ असे कार्यक्रम होणार आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 09/Dec/2024














