लांजा : आसगे मांडवकरवाडीत १२ डिसेंबरपासून दत्त जयंती सोहळा

लांजा : श्री गुरुवर्य श्री दत्तात्रय महाराज यांच्या आशीर्वादाने लांजा तालुक्यातील श्री क्षेत्र दत्तसेवा मंडळ मांडवकरवाडी (डोंगर पायथा) आसगे येथे १४ डिसेंबर रोजी दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत.

आसगे मांडवकरवाडी येथे दरवर्षी आसगे दत्त जयंती सोहळा आयोजित केला जातो. मांडवकरवाडीमध्ये श्री दत्तात्रय महाराज आश्रम असून, या आश्रमाला मोठ्या प्रमाणात तालुक्यातून भाविक, भक्तगण येऊन मनोभावे सेवा करतात. गेल्या अनेक वर्षापासून येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. भक्तिभावाने या ठिकाणी नामस्मरण, ग्रंथवाचन, दत्त जन्मोत्सव, दत्तांची महाआरती तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

दत्त जयंती सोहळ्यानिमित् मनोरंजनासाठी लोककला बहुरंर्ग नमन मंडळ लांजा तालुका यांच्य मान्यतेने दि. १२ डिसेंबर रोजी रात्री १० वा. तालुकास्तरीय श्री राम-रावण युद्ध नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. दि १४ डिसेंबर रोजी रात्री १० वा. श्र ब्राम्हणदेव नमन मंडळ इसवर्ल पाथरवाडी यांचा बहुरंगी नमनाच कार्यक्रम आयोजित केला आहे तालुक्यातील भाविकांनी दत्त जयंती सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन श्री दत्तसेवा मंडळ मांडवकरवाडी (डोंगर पायथा) आसगे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 09/Dec/2024