रत्नागिरी : सर्दी, ताप आलेल्या लहानग्या मुलीला उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. श्रीशा सचिन सावंत (वय ११ महिने, रा. भोके, रत्नागिरी) असे मृत मुलीचे नाव आहे.
ही घटना २ डिसेंबरला घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीशाला सर्दी, ताप असल्याने तातडीने तिला उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:21 09-12-2024














