खेड : तालुक्यातील तिसंगी दांडयाचा माळ या ठिकाणी जंगलमय भागात धगधगत असलेली बेकायदा गावठी दारु अड्ड्यावर येथील पोलिसानी टाकलेल्या धाडीत तब्बल १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
देवानंद महीपत भोसले (वय ५० वर्षे रा. तिसंगी पिंपळवाडी ता. खेड) असे त्या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे टाकण्यात आलेल्या धाडीत १, लाख १२ हजार, ५०० रुपये मुद्देमाल मध्ये २५, हजार रुपये किंमतीचे एक मोठ्या आकाराची सुमारे १००० लिटर मापाची लोखंडी पत्र्याची टाकी ७७, हजार रुपये किंमतीचे त्यामध्ये ५०० लीटर मापाच्या काळया रंगाच्या प्लास्टीकचा ०४ टाक्या १० हजार, ५०० रुपये किंमतीचे १०५ लीटर गावठी हातभट्टीची दारु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:18 PM 09/Dec/2024