रत्नागिरीत २८ फेब्रुवारीपर्यंत पशुगणना मोहीम

रत्नागिरी : एकविसावी पशुगणना २५ नोव्हेंबर रोजी सुरू झाली असून ती २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. संपूर्ण तालुक्यात एकाच वेळी पशुगणना केली जाणार आहे. ही मोहीम जवळपास तीन महिने राबविण्यात येणार आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत घरोघरी जाऊन माहिती घेतली जाणार आहे.

पशुसंवर्धन विभागाची ध्येयधोरणे निश्चित करून विभागामार्फत विविध योजना राबविण्यासाठी पशुगणना कामी येणार असल्याने सर्व नागरिकांनी व पशुपालकांनी प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी चेतन शेळके, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. आदिती कसालकर यांनी केले आहे.

एकविसावी पशुगणना करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ग्रामीण भागात ३ हजार कुटुंबामध्ये एक प्रगणक आणि पाच प्रगणकामागे एक पर्यवेक्षक तसेच शहरी भागात ४ हजार कुटुंबामागे एक प्रगणक आणि १० प्रगणकामागे एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी २८ प्रगणक व ४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. दूध, अंडी, मांस आदींच्या उत्पादनामुळे पोषण सुरक्षेसोबत ग्रामीण उपजीविकेलाही चालना मिळते. पशुपालन क्षेत्राचा शाश्वत विकास घडवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना प्रोत्साहन

पशुगणनेच्या कालावधीत पशुधनाच्या १६ प्रजातींचा म्हणजेच पाळीव प्राणी, कुक्कुटपालन, भटक्या प्राण्यांची पशुगणना करण्यात येणार आहे. पशुगणनेसाठी प्रगणकांनी स्वतःच्या मोबाइल अॅपवरून माहिती संकलित करायची आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, वराह, उंट, घोडा, शेळी, मेंढी, गाढव, हत्ती, मिथुन व कुक्कुट पक्षी (कोंबडे – कोंबड्या, बदक, टर्की, इमू, क्वेल, गिनी, शहामृग इत्यादी) अशा १६ प्रजातींची माहिती संकलित केली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 10/Dec/2024