देवरुख न.पं. कडून व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

देवरुख : शहरामध्ये एकल प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या बाजारपेठेतील व्यापारी व आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांवर रविवार प्लास्टिक बंदीची धडक कारवाई नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी दिली.

शहरातील व्यापारी, नागरिक, किरकोळ विक्रेते यांना वारंवार सुचना देवूनही एकल प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू होत आहे. यामुळे नगर पंचायत प्रशासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी व्यापक प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्याचे योजले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी आठवडा बाजाराच्या दिवशी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणारे नागरिक व व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक पिशव्यांची जप्ती करून दंड वसूल करण्यात आला.

तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून पर्यावरणाच्या होणाऱ्या हासाबाबत नगर पंचायतीमार्फत नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये प्लास्टिकविरोधी जनाजागृती करण्यात आली.

नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सोडून कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहनही नगर पंचायत प्रशासनाने यावेळी केले. ही प्लास्टिक बंदी मोहीम नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित राणे, प्रवीण खरात, स्वच्छता निरीक्षक आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे लिपीक व कर्मचारी यांनी राबविली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 10/Dec/2024