राजापूर : सहकार व पणन विभाग, आशियायी विकास बँक अर्थ सहाय्यित मॅग्नेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे, राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय रत्नागिरी आणि कृषी व आत्मा विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने १२ डिसेंबर रोजी ‘आंबा – उत्तम कृषी पद्धती’बाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यातील कोतापूर फाटा येथील उत्सव गार्डन येथे प्रशिक्षण होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्मा प्रकल्प संचालक विजय बेतीवार, मॅग्नेट प्रकल्प विभागीय उपसंचालक मिलिंद जोशी, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक महेश टिळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख, तालुका कृषी अधिकारी अनिल गावित आदी उपस्थित राहणार आहेत. निर्यातक्षम आंबा उत्पादन – आदर्श व्यवस्थापन पद्धती, आंबा प्रक्रिया उद्योग, आंबा कीड व रोग नियंत्रण, आंबा मार्केटिंग तंत्रज्ञान आदी विषयांवर केले जाणार आहे. राजातील प्रगतशील शेतकरी, विद्यार्थी, महिला बचत गट व शेतीची आवड असणाऱ्या सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 10/Dec/2024