रत्नागिरी : सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीबाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, ७/१२,कृषि खात्याचा दाखला, जी.एस.टी.बिल, बँक तपशील, आधार कार्ड, हमीपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे उपविभागीय कार्यालय, शांतीनगर, नाचणे, जि. रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा. अथवा कृषि व्यवसाय पणन तज्ज्ञ पवन बेर्डे (७२१८३५००५४) यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज प्राप्त करणे तसेच जमा करण्याची सुविधा कुडाळ सुविधा केंद्र, MIDC कुडाळ, हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्र, जामसंडे, ता. देवगड या ठिकाणी करण्यात आली आहे.
अनुदान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:54 PM 10/Dec/2024














