रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनने १३ ते १५ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा होईल.

सिंगल्स, डबल्स आणि लकी डबल्स अशा विविध गटांमध्ये स्पर्धकांना भाग घेता येईल. भाग घेण्यासाठी इच्छुकांनी www.mbasso.in या संकेतस्थळाला भेट देऊन ११ डिसेंबरपूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सिंगल्स, डबल्ससाठी ८०० रुपये, तर लकी डबल्ससाठी १००० रुपये नोंदणी शुल्क आहे.

सबज्युनिअर अँड ज्युनिअर चॅम्पियनशिप बॅडमिंटनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे अध्यक्ष हिराकांत साळवी आणि सेक्रेटरी डॉ. संदीप करे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी बिपिनचंद्र गांधी (9403507507) किंवा नीलेश मलुष्टे (9422430044) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 10-12-2024