लांजा : खानू मठ ते वाकेडपर्यंत वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांकडून दंड वसूल

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील खानू मठपासून वाकेडपर्यंत वेगमर्यादा जास्त असणाऱ्या वाहनचालकांकडून स्पीड गनच्या माध्यमातून दंड वसूल करण्यात येते. यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अगोदर रस्त्याचे काम पूर्ण करा, वेगमर्यादेचे फलक लावा आणि मग दंड वसूल करा, अशी मागणी होत आहे.

महामार्गाने वाहने चालवताना बाजूला असलेल्या फलकांवर वेगमर्यादेचे पालन न करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खानू मठपासून वाकेडपर्यंत वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना परिवहन विभागाच्या ‘स्पीड गन’ मुळे चाप बसतो. स्पीड गन कॅमेरा लावून वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येतो.

महामार्ग जसजसा पूर्ण होईल तसे अपघातप्रवण क्षेत्रात असे अजून स्पीड गन कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. महामार्गावर वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित केलेली असते. महामार्गाची अवस्था बिकट असल्याने चालक चांगला रस्ता मिळाल्यास वेग वाढवतात अशातच वेगमर्यादा वाढवल्यामुळे त्यांच्यावर दंड आकारला जातो.

कारवाई करणे सोपे जाते
वेगाने गाड्या चालवून होणारे अपघात टाळण्यासाठी स्पीड गन कॅमेरे बसवण्यात येतात. या गन वाहनाची दिशा, वेग, कोणत्या लेनने वाहन मार्गस्थ झाले, कॅमेरा कुठे लावला आहे, तारीख, वेळ आदी सर्व माहिती देतात. त्यामुळे कारवाई करणे सोपे जाते. दंडाची पद्धतही ऑनलाईन आहे.

कसरत गेले दहा वर्षे
रस्त्याच्या कामावावत प्रशासनाची उदासीनता गेली दहा वर्षे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांवर खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे ही कसरत करावी लागते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 10/Dec/2024