रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय खुल्या लेखस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेकरिता पद्मभूषण चरित्रकार डॉ. धनंजय कीर, व्यक्तिमत्त्व विकासात ग्रंथालयांचे महत्त्व, राष्ट्राच्या विकासात महाराष्ट्राचे स्थान यापैकी कोणत्याही एका विषयावर लेख लिहायचा आहे. लेख स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा टंकलिखित असावा, लेखाची शब्द मर्यादा १००० ते १२०० शब्द आहे. लेखावर स्वतःची ओळख कुठेही नसावी. स्पर्धकाने स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता, संपर्काचा भ्रमणध्वनी स्वतंत्र कागदावर लेखासोबत जोडावा. यशस्वी ३ स्पर्धकांना अनुक्रमे २,००० रुपये, १,५०० रुपये आणि १,००० रुपयांचा धनादेश स्वरूपात देण्यात येईल. योग्य लेख असल्यास प्रथम ३ क्रमांकाशिवाय २ लेखांचा उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल, सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. यशस्वी स्पर्धकांना, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सन २०२४- २५ च्या होणाऱ्या वार्षिक अधिवेशनात पुरस्कार प्रदान करण्यात येईल, लेख महेंद्र रामचंद्र दळवी, प्रमुख कार्यवाह, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ, द्वारा पुण्याई, ६७४ ब, श्रीरामनगर, मु. पो. नाचणे, ता. जि. रत्नागिरी या पत्त्यावर २५ डिसेंबरपर्यंत पाठवावेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 10/Dec/2024














