रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धोपेश्वर तिठवली येथील आंबा बागेत नेपाळी कामगाराने अज्ञात कारणातून आंबा बागेत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते रविवार ८ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वा. कालावधीत घडली आहे.
बिरेंद्र बहादूर बगाले मगर (वय २०, मूळ रा. कैलाला, नेपाळ सध्या रा. धोपेश्वर तिठवली, राजापूर) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या नेपाळी कामगाराचे नाव आहे. याबाबत बाग मालकाने राजापूर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
त्यानुसार, बिरेंद्र हा त्यांच्या आंबा बागेत कामाला होता. शनिवारी सायंकाळी ते रविवारी दुपारच्या कालावधीत त्याने अज्ञात कारणातून बागेतीलच एका आंबा झाडाच्या फांदीला पिवळ्या रंगाच्या दुपट्ट्याने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 10/Dec/2024














