चिपळूण : अनारी नदी पात्रात श्रमदानाने वनराई बंधारे

चिपळूण : येथील अनारी गावातील नदी पात्रामध्ये ग्रामस्थांच्या श्रमदानाने श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या नेतृत्त्वाखाली सरासरी २५ फूट लांबीचे ३ मोठे वनराई बंधारे बांधण्यात आले. रविवार दि. ८ रोजी गावातील सुमारे महिला, पुरुष आणि गावातील तरुणवर्ग या श्रमदानात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या संपूर्ण श्रमदान कार्यक्रमात स्पर्श फाऊंडेशन (अनारी), अर्थ फाऊंडेशन-चिपळूण, अॅक्टिव्ह ग्रुप चिपळूण, टी. डब्लू. जे. फाऊंडेशन चिपळूण, केदारनाथ तरुण विकास मंडळ (मुंबई-पुणे) आदी संस्थांचा सहभाग होता.

प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पूजा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या श्रमदान कार्यक्रमामध्ये श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संदेश पवार, विलास पवार, रुपेश पवार यांच्यासह गावच्या उपसरपंच वेदांती पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार, शांताराम लाड, हनुमान समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पवार, विलास पवार, स्पर्श फाऊंडेशनचे गौरव पवार, प्रवीण पवार, शिवसेना शाखाप्रमुख सुशांत पवार, उद्योजक प्रदीप पवार, जय हनुमान नवतरुण मित्र मंडळाचे सौरभ कदम, रुपेश काणेकर यांचे सहकार्य लाभले, यावेळी टी. डब्लू. जे. फाऊंडेशनचे ग्राम विकास समन्वयक प्रथमेश पोमेंडकर आणि आशिष कांबळे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले तर अर्थ फाऊंडेशनचे शाहनवाज शाह यांनी जल संवर्धनाचे महत्त्व विषद केले. सूत्रसंचालन विजय कदम यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 10/Dec/2024