पुण्यात राष्ट्रीय सहकार निगममध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे सादरीकरण

रत्नागिरी : केंद्र सरकारने अंगीकृत केलेल्या राष्ट्रीय सहकार निगमने पुण्यातील वैकुंठभाई मेहता इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय अभ्यासवर्गात समाविष्ट सहकार प्रतिनिधींसमोर स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची यशोगाथा मांडण्याची संधी प्राप्त करून दिली.

ही यशोगाधा संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी मांडली.

या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या तीन संस्थांचे प्रेझेंटेशन करण्यात आले. त्यामध्ये पतसंस्था वर्गामध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची माहिती, कार्यपद्धती, सांख्यिकी प्रगती, प्राप्त पुरस्कार इत्यादीबाबत प्रेझेंटेशन करण्यात आले. तीन देशांच्या २५ प्रतिनिधींसमोर स्वरूपानंद पतसंस्थेची माहिती मांडता आली आणि या प्रेझेंटेशनसाठी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची केलेली निवड संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर कोकणातील सहकारी संस्था मांडली जाते, हे प्रेरणादायी ठरणार आहे, असे प्रतिपादन ॲड. पटवर्धन यांनी केले. राष्ट्रीय सहकारी निगम या संस्थेने केलेल्या या आयोजनात संधी दिल्याबद्दल ॲड. पटवर्धन यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 10-12-2024